आपला क्लासची सुरुवात 2009 यावर्षी झाली , सुरुवातीला आपला क्लास सुयश क्लास येथे, त्यानंतर पेठे हायस्कूल त्यानंतर भद्रकाली मंदिर येथे आपल्या क्लास होता 2012 यावर्षी आपण नाशिक रोड येथे क्लासेस सुरुवात केली. आपले संस्थेतर्फे दरवर्षी जानेवारी आणि जून महिन्यामध्ये ज्योतिष वर्ग घेतले जात होते 2019 साले ऑनलाईन करण्याचा विचारात आम्ही होतो आणि त्यानंतर कोरोना आला आणि सगळ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्या, मग आपला क्लास सुद्धा ऑनलाईन झाला, सुरुवातीला व्हिडिओ कोर्सेस होते त्यानंतर ऑनलाईन कोर्सेस सुरू झाले, आता व्हिडिओ आणि ऑनलाइन असं दोन्ही स्वरूपात आपला क्लास सुरू असतो, लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर त्या लेक्चरचा रेकॉर्डिंग सगळ्यांना दिला जातो आणि विद्यार्थी हे लेक्चर वारंवार ऐकून उत्तम प्रकारे तयार होतात, आज पर्यंत आपल्या संस्थेतर्फे जवळ जवळ 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी तयार झाले आहेत त्यापैकी अनेकांनी स्वतःचे ज्योतिष कार्यालय उघडले आहे काही जण घरून पाहत आहेत, तर काहीजण हाऊस म्हणून शिकत असतात, विद्यार्थ्यांचा उद्देश कोणताही असला तरी शिकवताना खूप साध्या सोप्या पद्धतीने आपल्याकडे शिकवले जाते
आता हर्षद महाजन सरांविषयी
सरांचे शिक्षण बीकॉम , सुरुवातीपासूनच ज्योतिष
शास्त्राची आवड होती सन 2001 पासून अनेक पुस्तकांवरून अभ्यास केला त्यानंतर ज्योती
विद्या संशोधन मंडळ येथे ज्योतिष प्रज्ञ, विशारद, प्रवीण, हे कोर्सेस केले हे करत असताना
त्यांना कैलासवासी नारायन बुट्ले सर, यांचे विशेष मार्गदर्शन
लाभले, त्यानंतर कैलासवासी सुरेश शहासने सर, कैलासवासी लक्ष्मण ठाकूर सर यांच्याकडे
कृष्णमूर्ती पद्धतीचे शिक्षण त्यांनी घेतले, साध्या सोप्या शब्दात विविध उदाहरणांच्या
माध्यमातून सर शिकवत असतात, सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीचे यश म्हणूनच आज एवढे विद्यार्थी
तयार होत आहेत, नाशिकचे पंचांग असावे या तळमळीतून सरांनी 2014 सा ली
महाजन पंचांगाची निर्मिती केली, याचबरोबर भावसाधन हे गणित पद्धतीचे पुस्तक सरांनी तयार
केले आहे, त्याचबरोबर कृष्णमूर्ती पद्धतीचे अंतरंग हे पुस्तकही सरांनी लिहिले आहे
2010 साली देशदूत या वृत्तपत्रांमध्ये कृष्णमूर्ती
पद्धत यावर एक वर्षभर लेखमालिका चालवली धन्यवाद
Write a public review